23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीएआयएफटीपी वेस्टर्न झोनच्या सहसचिवपदी राजकुमार भांबरे यांची नियुक्ती

एआयएफटीपी वेस्टर्न झोनच्या सहसचिवपदी राजकुमार भांबरे यांची नियुक्ती

परभणी : ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या (वेस्टर्न झोन) मॅनेजमेंट कमिटी मेंबरच्या निवडणुकीत राजकुमार शंकरराव भांबरे विजयी झाले होते. ही निवडणूक २०२४-२५ साठी मॅनेजमेंट कमिटी मेंबरसाठी झाली होती. परभणी येथील कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे हे मराठवाडा विभागातून एकमेव या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर सुरत येथे सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी दुस-या कार्यकारिणी बैठकीत राजकुमार भांबरे यांची एआयएफटीपी वेस्टर्न झोनच्या सहसचिवपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच उपाध्यक्ष म्हणून सीए. कमलेश साबू (ठाणे), सहसचिवपदी श्री.केतन शहा व स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे.

कार्यकारिणीच्या प्रथम बैठकीमध्ये अध्यक्षपदी अ‍ॅड.शशांक मिठाईवाला, सचिवपदी सीए. अक्षय मोदी, कोषाध्यक्षपदी हरीष चुगानी यांची निवड झाली होती. देश पातळीवरील काम करणा-या या संघटनेच्या वर्ष २०२४ करीता वरील पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. एआयएफटीपी ही कर सल्लागाराची संस्था गेल्या ५० वर्षापासून कार्यरत आहे. मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र एआयएफटीपीसोबत व जीएसटी पीएएम मुंबई यांच्यासोबत कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे काम भांबरे करत आहेत. सुरत येथील बैठकीत सर्वानुमते संघटनेच्या सहसचिवपदी नियुक्ती करून राजकुमार भांबरे यांचा पदाधिका-यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या नियुक्तीबद्दल राजकुमार भांबरे यांचे परभणी शहरातील व्यापारी, करसल्लागार, सीए., सामाजिक संघटना व मित्र परीवारांनी अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR