21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभारतात ११ एप्रिलला साजरी होणार रमजान ईद

भारतात ११ एप्रिलला साजरी होणार रमजान ईद

नवी दिल्ली : ईद-उल-फित्र हा इस्लाम धर्मातील मोठा सण आहे. हा दिवस ईद किंवा रमजान ईद म्हणून ओळखला जातो. ईद-उल-फित्र हा पवित्र रमजान महिन्याचा शेवट मानला जातो. रमजानच्या काळात मुस्लिम समाजाचे लोक उपवास ठेवतात आणि पवित्र कुराणाचे पठण करतात.

सौदी अरेबिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांतील लोकांनी ११ मार्च २०२४ पासून उपवास सुरू केला. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा वर्षातील नववा महिना आहे. या महिन्यात २९ किंवा ३० दिवस असतात. यंदा रमजानचे २९ दिवस पूर्ण होऊनही या देशांमध्ये ९ एप्रिलला ईदच्या चंद्राचे दर्शन झाले नाही. त्यामुळे यावेळी रमजान महिना पूर्ण ३० दिवसांचा असेल. भारतातील इस्लाम धर्मियांनी १२ मार्च २०२४ पासून उपवास सुरू करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे भारतात आज म्हणजे १० एप्रिल रोजी ईद-उल-फित्रचा चंद्र दिसू शकतो. हे पाहता भारतात ११ एप्रिल रोजी ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जाणार आहे.

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मशिदीतून घोषणा केली आहे की, आज सौदी अरेबिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांमध्ये चंद्र दिसला नाही. त्यामुळे भारतात ११ एप्रिल रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाणार आहे. आज भारतातील सर्व राज्यांतील लोकांशी बोलून चंद्र कुठेही दिसला नसल्याची माहिती गोळा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा, हैदराबाद, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
जामा मशिदीजवळील बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. ईद-उल-फित्रच्या दिवशी जामा मशिदीत मोठ्या संख्येने लोक जमत असल्याने दिल्ली पोलिसांनी चोख विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR