23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयमदरशांमध्ये दिले जाणार आता रामायणाचे धडे!

मदरशांमध्ये दिले जाणार आता रामायणाचे धडे!

वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय कुराणसह शिकविण्यात येणार

देहराडून : उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण शिकवले जाणार आहे. रामायणाचा अभ्यासक्रम म्हणून समावेश केला जाणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या एकूण ११७ मदरशांपैकी चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या ११७ मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल. शिक्षकांची भरती झाल्यानंतर उर्वरित ११३ मदरशांमध्ये ही नियुक्ती केली जाईल असे अधिका-यांनी सांगितले. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मदरशातील मुलांना ड्रेसकोड देखील बदलण्यात येणार आहे.

कुराणसह रामायण शिकवले जाणार
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, कुराणसोबतच आम्ही विद्यार्थ्यांना रामायणही शिकवू. वक्फ बोर्ड चार मदरशांसाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती करेल, ज्यांना या विषयात पारंगत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम दिले जाईल. मंडळाने पुढे सांगितले की, नवीन अभ्यासक्रमाच्या परिचयासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात येत आहे.

मदरशे स्मार्ट क्लासरूमसह विकसित
शादाब शम्स म्हणाले की, निवडलेल्या चार मदरशांना स्मार्ट क्लासरूमसह विकसित केले जाईल. या संस्थांचे शैक्षणिक दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे आणि आम्ही नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुस्तके सादर करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR