21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजन‘सिंघम ३' मधील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक

‘सिंघम ३’ मधील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक

मुंबई : अनेक दिवसांपासून चाहते ‘सिंघम 3’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिंघम सिरींजमधील पहिल्या आणि दुसऱ्या पार्टला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. सध्या सतत या चित्रपटाबद्दल नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

रणवीर सिंहने शेअर केला पोस्टर
रणवीर सिंहने इंस्टाग्राम वर या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये रणवीर सिंबाच्या भूमिकेत दिसत असून त्याने यामध्ये पोलिसांची वर्दी घातली आहे. ही पोस्ट शेअर करत रणवीरने लिहिलंय की, “सर्वात खोडकर, सर्वात अनोखा.. आला रे आला सिम्बा आला.” रणवीरचा हा लूक पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

‘सिंघम ३’ मध्ये रणवीर सिंह याच्याशिवाय चित्रपटात अजय देवगणसोबतच करीना कपूर, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आहेत. त्याचबरोबर रणवीर सिंह आणि अक्षय कुमार या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. सिंघम ३’ हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR