पुणे : खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौ-याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला आहे. दौंडमधील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत थांबले आहेत. या हॉटेलबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांकडून संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संजय राऊत यांच्या दौ-यावेळीदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.