30 C
Latur
Sunday, June 1, 2025
Homeमुख्य बातम्याआरबीआयचा सहकारी बँकांना दणका

आरबीआयचा सहकारी बँकांना दणका

नवी दिल्ली : १८ जानेवारी २०२४ रोजी रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर कारवाई केली. या बँकांना लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.

ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम पाळले नाहीत.

रिझर्व्ह बँकेने एनकेजीएसबी सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही आणि ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR