35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरसोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस पाच वर्षांपासून बंद

सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस पाच वर्षांपासून बंद

सोलापूर : सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवास, मिरज व सांगली येथे वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सोयीची असलेली सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस पाच वर्षांपासून बंद आहे. या रेल्वेचा लाभ घेणारे साधारण दीड हजार प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करीत एस.टी अथवा खासगी ट्रॅव्हलने प्रवास करावा लागतो आहे. मध्य रेल्वे सोलापूर विभागाची सोलापूर-कोल्हापूर (गाडी क्र. – ११०५१) ही रेल्वे सुमारे १५ वर्षांपूर्वी सुरू झाली. मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर = एक्स्प्रेस) सोलापूरला सकाळी ७.२० वाजता आल्यानंतर त्या गाडीची साफसफाई करून ८.२५ वाजता कुर्डुवाडी-पंढरपूर-सांगोला-मिरज मार्गाने कोल्हापूरकडे जात होती.

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर येथे सकाळी ७ वाजता पोचल्यानंतर कोल्हापूर-सोलापूर ही एक्स्प्रेस कोल्हापूर येथून सकाळी ८.४५ सोलापूरकडे सुटत असे. या दोन्ही रेल्वे गाड्यांचा प्रवास दिवसा असल्याने प्रवाशांची व भाविकांची संख्या मोठी होती. प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक होता. परंतु काही वर्षानंतर कोणतीही मागणी नसताना रेल्वे प्रशासनाने या गाडीची वेळ रात्रीची केली. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस येथून रात्री ११.३५ वा कोल्हापूरकडे केल्यानंतर या गाडीच्या प्रवाशांची संख्येवर परिणाम झाला. परंतु मराठवाड्यातील नागरिकांना ही गाडी सोयीची होती. दिवसभर काम करून रात्रभरचा सुरक्षित प्रवास करीत होते. त्याचबरोबर सांगली व मिरज येथे उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी रात्रीचा प्रवास करून सकाळी शिक्षणासाठी वेळेत पोहचत होते. गोवा, तळ कोकणात जाण्यासाठीही गाडी अत्यंत सोयीची होती. त्यामुळे रात्रीच्या गाडीलाही प्रवाशांची पसंती होती.

मात्र कोरोनामध्ये ही गाडी बंद करण्यात आली. अद्याप गाडी सुरू झाली नाही. सोलापूरसह मराठवाड्यातील साधारण दीड हजार प्रवाशांच्या हक्काची गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.नोकरदार, चाकरमानी गिरिकांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची होती. मोडनिंब येथे पॅसेंजर वळता इतर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा ठेवला नाही. त्यामुळे अनेकांची रसोय होत आहे. व्यापाऱ्याच्यादृष्टीनेही ही गाडी सोयीची होती. सोलापूर-कोल्हापूर गाडी पूर्ववत करून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी होत आहे.प्रवासी सेवा संघाने गाडी सोलापूर येथून कलबुर्गीपर्यंत विस्तारित करण्याचीही मागणी सोलापूर व क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांच्याकडे केली होती. या विस्तारीकरणामुळे अकलकोट-गाणगापूर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांना सोयीची ठरणार असल्याने प्रवासी संख्येत वाढ होणार होती. कोरोना कालावधीपूर्वी ही रेल्वे बंद करण्यात आली. कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे असून पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे असे प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR