30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeक्रीडाआरसीबीची चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक

आरसीबीची चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक

मुलानपूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाबसमोर १०२ धावांचे माफक आव्हान ठेवले होते.

आरसीबीने हे आव्हान १ विकेटच्या मोबदल्यात १० ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि पहिल्याच झटक्यात फायनलचे तिकीट मिळवले. आरसीबीने १० ओव्हरमध्ये १०६ रन्स केल्या. यासह आरसीबीची ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची चौथी तर २०१६ नंतरची पहिली वेळ ठरली. तर दुस-या बाजूला पंजाबला या पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR