27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमराठा आरक्षणासाठी राजीनाम्यास तयार

मराठा आरक्षणासाठी राजीनाम्यास तयार

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असतानाच आता याचे पडसाद साहित्य संमेलनात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात मराठा आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या आणि मराठा आंदोलनाचा मुद्दा मांडल्याचे पाहायला मिळाले. तर, मराठा समाजासाठी वेळ पडल्यास आम्ही राजीनामे द्यायला तयार असल्याचं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले आहेत.

यावेळी बोलतांना ठाले पाटील म्हणाले की, ह्लमराठवाड्यातील सर्वच मराठे हे कुणबी आहेत. मराठवाड्यातील आणि विदर्भातील मराठ्यांची नातेसंबंध आहेत. ते जर कुणबी असतील तर मराठवाड्यातील मराठे कुणबी कसे नाहीत. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीत. विदर्भातील वंशजांना आरक्षण मिळते, पण मराठवाड्यात मिळत नाही. यांची मुली तिकडे आणि त्यांच्या मुली इकडे दिल्या आहेत. पण आरक्षण मिळत नाही, हा कुठला न्याय आहे. नीट लक्षात घेतलं तर राजकीय पक्ष लक्षात घेत नाही आणि न्यायालय देखील लक्षात घेत नाही. नैसर्गिक आणि ऐतिहासिकपणाने मराठवाड्यातील मराठे कुणबी आहे. त्यामुळे मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. मी भावनेपोटी बोलत नसून, हे माझे निरीक्षण असल्याचे ठाले पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR