जळगाव : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून आठवडाभरात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.
यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह ६५,४०० रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. देशात लग्नाचा हंगाम सुरू झाला त्यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. अशात सोने-चांदीचे दर दिवसागणिक वाढताना दिसत आहेत.
सोन्याच्या वाढत्या दराबाबत सोने व्यावसायिकांच्या मते जागतिक पातळीवर अमेरिकन बँकांच्या वतीने व्याज दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यात गुंतवणूक करण्यात न आल्याने गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दरात वाढ होत आहे.