21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रयंदा साखर उत्पादन विक्रमी ?

यंदा साखर उत्पादन विक्रमी ?

पुणे,प्रतिनिधी : राज्यामध्ये सुरू असणा-या ऊसाच्या गाळप हंगामात साखर उत्पादन ९५ लाख टन होण्याचा अंदाज वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने व्यक्त करण्यात आला आहे याआधीच्या अंदाजानुसार ८८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित धरले होते. त्यामध्ये अंदाजे १० ते १२ टक्के वाढ अपेक्षित आहे.
असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची सभा नुकतीच झाली त्यानंतर अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले राज्यात सहकारी आणि खासगी १९५ साखर कारखाने सुरू असून गैरमोसमी पावसामुळे प्रती हेक्टरी ऊसाच्या उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ झाली आहे .

परिणामी गाळप हंगामाचा कालावधी वाढणे शक्य आहे. आधीच्या अंदाजानुसार शंभर दिवसाचा हंगाम गृहीत धरले होते पण त्यामध्ये २० दिवस वाढणे शक्य आहे. डिसेंबर अखेर राज्यात ४० टक्के उस गाळप झाले आणि ३८ लाख मे टन साखर उत्पादन झाले तर उर्वरित ६० टक्के उस गाळपामधून एकूण साखर उत्पादन ९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.

अवकळी पावसामुळे प्रती हेक्टरी ऊसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे आणि उस इथेनोल कडे अधिक प्रमाणात वळविण्यात आला होता आणि कमी झालेली साखरेची मागणी कमी झाली आहे . सुरूवातीला राज्यात ८८ लाख टन साखर अंदाज होता त्यात ८ ते १० लाख टन इथेनोल कडे वळविण्यात येण्याचा अंदाज होता. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक गुजरात राज्यात उत्तर प्रदेश राज्यात साखर उत्पादनात वाढ होणे शक्य आहे त्यामुळे देशामध्ये या हंगामात ३२० लाख टनापर्यंत साखर उत्पादन होणे शक्य आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR