22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआंतरवाली सराटीमधील गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार

आंतरवाली सराटीमधील गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार

सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया

नागपूर : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीमार केला होता. यानंतर आंदोलनाचा भडका राज्यभर उडाला. याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) विधानसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये त्या दिवशी घडलेल्या घटनेचा तपशील सादर केला. तसेच त्यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. गुन्हे सरसकट मागे घेण्यास फडणवीसांनी नकार दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बाळाचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलीस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस सर्वाधिक जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीमारानंतर गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली आहे. मात्र, या संदर्भात फडणवीस यांनी कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिला आहे.

सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले गुन्हे हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत हे शुक्रवारी विधानसभेतील फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरावरून स्पष्ट झाले आहे. फडवणीस यांनी अधिवेशनामध्ये सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देत एक प्रकारे पोलिसांची पाठराखण केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावरून आता रणकंदन होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR