28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeउद्योगरिलायन्सने गाठला २० लाख कोटींचा माईलस्टोन!

रिलायन्सने गाठला २० लाख कोटींचा माईलस्टोन!

नवी दिल्ली : देशाची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने अजून एक इतिहास रचला आहे. रिलायन्स कंपनी २० लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असणारी पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास १ लाख कोटींहून अधिकची वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने १९ लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. मंगळवारी इरए वर रिलायन्सने ५२ आठवड्यांचा उच्चांक २९५७.८० रुपये गाठला. या शेअरमध्ये १.८९ टक्क्यांची वाढ दिसून आली.

२ आठवड्यात एक लाख कोटींचे वाढले मुल्य
गेल्या दोन आठवड्यात कंपनीचे स्टॉक मार्केटमधील भांडवल जवळपास १ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने १९ लाख कोटी रुपयांचा आकडा २९ जानेवारी रोजी गाठला होता. २०२४ मध्ये गुंतवणूकदारांनी रिलायन्सवर भरभरुन प्रेम केले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास १४ टक्क्यांनी वधारला.

हुरुन यादीत रिलायन्स पहिल्या क्रमांकावर
एक दिवसांपूर्वीच हुरुन इंडिया ५०० यादी जाहीर झाली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा दबदबा दिसून आला. कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सलग तिस-या वर्षी कंपनीने ही कमाल करुन दाखवली. दुस-या स्थानावर टीसीएस आणि एचडीएफसी बँक ही या यादीत तिस-या क्रमांकावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR