भारत-नेपाळ सीमेवर धार्मिक तणाव

सुनसरी : भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा दोन धार्मिक समुदायांमध्ये संघर्ष झाला. परिस्थिती बिघडल्यावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात २४ वर्षीय ओम प्रकाश मेहता यांचा मृत्यू झाला. डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. यात सुरक्षा कर्मचा-यांचाही समावेश आहे.

हा संघर्ष देवगंज ग्रामीण नगरपालिकेच्या कप्तानगंज परिसरात झाला. दोन्ही समुदाय तिथे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम करत होते. याच दरम्यान लाऊडस्पीकर वाजवण्यावरून आणि धार्मिक झेंडे लावण्यावरून वाद झाला. बघता बघता या प्रकरणाने हिंसक रूप धारण केले. घटनेनंतर प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ५ बाजारपेठांच्या परिसरात अनिश्चित काळासाठी निर्बंध लादले आहेत. आता या परिसरात ४ पेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत. मिरवणुका, निदर्शने, धरणे आणि सार्वजनिक सभांवरही बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

अमेरिकेतील सिएटलमध्ये रविवारी संध्याकाळी बाइट ऑफ सिएटल फूड फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या गोळीबारात २ लोकांचा मृत्यू झाला, तर ५ लोक जखमी झाले. जखमींमध्ये २ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर वेढला असून प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या कोणालाही अटक झाल्याची पुष्टी झालेली नाही. गोळीबार संध्याकाळी सुमारे ६ वाजता झाला, जेव्हा फेस्टिव्हल संपणार होता. घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. अनेक विक्रेते आपले स्टॉल सोडून पळून गेले.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका ५६ वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे, तर २ वर्षांचे बाळ, एक २३ वर्षीय युवक आणि ३९ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. वॉशिंग्टनचे गव्हर्नर बॉब फर्ग्युसन यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सांगितले की, राज्य पोलिसांचे स्वॉट पथक स्थानिक पोलिसांना मदत करत आहे. पोलिसांनी लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news