22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीपरभणी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाची दूरवस्था

परभणी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाची दूरवस्था

परभणी : येथील जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे जागोजागी प्लॅस्टर गळून पडत आहे. या शिवाय इमारतीत जागोजागी क्रीडा साहित्य धूळखात पडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे इमारतीत कच-याचे ढिगारे साचले असून त्यामुळे या इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे. वरीष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देवून जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय इमारतीच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी या ठिकाणी येणा-या खेळाडूंसह क्रीडाप्रेमी नागरीकातून होताना दिसून येत आहे.

शहरातील स्टेशन रस्त्यावरील स्टेडीयम परीसरात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आहे. परंतू या कार्यालयात ओपन जिमचे साहित्य दुरावस्थेत पडल्याचे दिसून येत आहे. तसेच या कार्यालयातून वरील मजल्यावर जाण्यासाठी असणा-या जिण्याचे प्लॅस्टर देखील कोसळले आहे. या शिवाय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजुचे प्लॅस्टर देखील गळून पडले आहे. तसेच इमारतीच्या परीसरात कच-याचे ढिगारे साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या शिवाय स्टेडीयमच्या मैदानावर क्रिकेट सामने व अन्य स्पर्धा होत असतात. परंतू हे सामने पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीच्या छताचे पत्रे अनेक ठिकाणी गायब झाले आहेत. त्यामुळे स्टेडीयमला अवकळा प्राप्त झाली आहे. या शिवाय स्टेडीयम परीसरात कुठलीही स्वच्छता राखण्यात येत नसल्याने या ठिकाणी येणा-या प्रेक्षकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टीकडे लक्ष देवून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयासह स्टेडीयम परीसरातील दुरावस्था दूर करण्यात यावी अशी मागणी खेळाडूुंसह प्रेक्षकांतून होत आहे.

स्टेडीयमचे प्रवेशद्वार बनले मुतारीची जागा
शहरातील स्टेडीयममध्ये जाण्यासाठी दुकान परीसरातून देखील एक गेट आहे. या गेटमध्ये नागरीक दिवसा तसेच रात्रीच्या वेळी सर्रांस लघुशंका करीत आहे. त्यामुळे हे गेट मुतारीची जागा बनली आहे. या गेटमध्ये सर्वत्र लघुशंका करण्यात येत असल्याने परीसरातील दुकान चालकांना देखील प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे वरीष्ठ अधिका-यांनी त्वरीत लक्ष देवून स्टेडीयम प्रवेशद्वारात लघुशंका करणा-यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR