नागरिकांच्या नगरसेवकांकडून वाढत्या अपेक्षा
रेणापूर (सिध्दार्थ चव्हाण) : पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य या मूलभूत सोयीसुविधांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे नगरसेवक हवे असल्याचे एकमत यूट्यूब चॅनलच्या वतीने नगरपंचायत निवडणूक अनुषंगाने ग्राऊड रिपोर्ट मध्ये नागरीकांनी भावना व्यक्त केल्या.
रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येणाऱ्या नगरपंचायतीच्या नगसेवकांकडून नागरीकांच्या काय अपेक्षा आहेत मागच्या काळात विकासाची कामे झाली आहेत . येणाऱ्या काळात कोणती कामे होणे अपेक्षित आहे . यासाठी रेणापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पक्षांच्या पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरीकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
रेणापूर चा बैलाच्या बाजारामुळे रेणापूरचे नाव प्रसिद्ध होते . ते रेणापूर चे गतवैभव मिळवण्यासाठी कोणी पुढे येणार आहे . रेणापूर शहरात मोठी बाजार पेठ असुन सुलभ शौचालयाची सोय नाही . तसेच रेणा मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असतानाही रेणापूर शहरात १० ते १५ दिवसाला नळाला पाणी सोडले जाते . बऱ्याच नागरीकांनी पाणी पुरवठ्याची योजना , शहरातील विविध मंदिरांचे जिर्णोध्दार करण्याचे काम आ रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे सांगितले तर पाणी पुरवठयाची योजना ही महाविकास आघाडी च्या काळात माजी आ धिरज देशमुख यांच्या प्रयत्नाने मिळालेली आहे.
मराठवाडयात केवळ रेणापूर शहरात महात्मा गांधीजीचा पुतळा आहे . पुतळ्याच्या सुभोकाणा चे काम गेल्या अनेक वर्षा पासून ते अपूर्ण आहे प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे . रस्ता , नाली , दिवाबत्ती सह रेणापूर शहराच्या मुलभूत प्रश्नांवर आवाज उठवणारे प्रतिनिधी निवडण्याची गरज व्यक्त केली.
निवडून जाऊन गायब होणारे नव्हे, तर वॉर्डमध्ये फिरून समस्या ऐकून घेणारे आणि तत्काळ उपाययोजना करणारे नगरसेवक हवेत,ह्व अशी भावना नागरीकांनी व्यक्त केल्या. रेणापूरमध्ये या निवडणुकीत मतदार ह्यविकासह्ण या मुद्द्याला प्राधान्य देताना दिसत असून, नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

