24.9 C
Latur
Sunday, July 7, 2024
Homeराष्ट्रीयबिहार ईओयूकडून अहवाल मागवला

बिहार ईओयूकडून अहवाल मागवला

नीट पेपर लीक प्रकरण एजन्सीकडे १० ठोस पुरावे तेजस्वींच्या जवळच्या लोकांशी लिंक?

पाटणा : बिहारमधील नीट पेपर लीकच्या संदर्भात, शिक्षण मंत्रालयाने बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. शिक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की ठएएळ शी संबंधित ग्रेस गुणांचा प्रश्न सोडवला गेला आहे.

पाटणा येथील परीक्षेतील गैरप्रकारांबाबत बिहार पोलिसांच्या तपास यंत्रणेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणात सहभागी आढळल्यास कोणतीही व्यक्ती/संस्थेवर कठोर कारवाई केली जाईल असा पुनरुच्चार सरकारने केला. येथे, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी दावा केला आहे की, या प्रकरणाची ंिलक तेजस्वी यादव यांच्या निकटवर्तीयांशी आहे. उमेदवार ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होते, ती खोली तेजस्वींचे पीएस प्रीतमने बुक केली होती. येथे, बिहार पोलिसांची तपास यंत्रणा नीट पेपर लीक प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहे. देशातील २४ लाख एनईईटी उमेदवार या एजन्सीच्या तपासावर आशा ठेवून आहेत. तपास यंत्रणा सुप्रीम कोर्टात पुरावे सादर करेल, अशी आशा उमेदवारांना आहे.

८ जुलैला होणार सुनावणी
नीट पेपर लीक प्रकरणी सुप्रीम कोर्टात ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. एजन्सीने घटनास्थळावरून सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेसह सर्व वैज्ञानिक पुरावे आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एजन्सीकडे इतके सबळ पुरावे आहेत की ते सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय घेऊ शकते. परीक्षार्थी आणि परीक्षा माफिया आणि त्यांच्याकडून जप्त केलेले पुरावे यांच्या आधारे तपास यंत्रणा पेपर फुटल्याचा दावा करते.

नीट परीक्षेवर चर्चा केव्हा? : खरगे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर लीकवर पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर विचारले की, पंतप्रधान परीक्षेची खूप चर्चा करतात. आपण नीट परीक्षेबद्दल कधी चर्चा करणार? नीट परीक्षा कधी रद्द होईल? मोदीजी, नीट परीक्षेतही तुमच्या सरकारची हेराफेरी आणि पेपरफुटी थांबवण्याची जबाबदारी घ्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR