27.1 C
Latur
Thursday, May 29, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरनिवासी उपजिल्हाधिका-यांना ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

निवासी उपजिल्हाधिका-यांना ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

अव्वल कारकूनही अडकला एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

शेतजमिनीच्या वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती, त्यापैकी ५ लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत पकडण्यात आले.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिका-यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना एसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अलीकडेच परभणी येथे एका महिला क्रीडा अधिका-यालाही लाच घेताना अटक झाली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.

उपजिल्ह्याधिका-यांच्या घरी धाडीत सापडले घबाड
– ५९ तोळे सोने, १३ लाख कॅश
एसीबीने खिरोळकर यांच्या घरातून तब्बल १३ लाख ६ हजार ३८० रुपयांची रोकड, ५८९ ग्रॅम म्हणजेच ५९ तोळे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत अंदाजे ५० लाख ९९ हजार ५८३ रुपये आहे. तसेच, ३ किलो ५५३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत ३ लाख ३९ हजार ३४५ रुपये एवढी आहे. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना नेमके काय-काय सापडले?
१) रोख रक्कम – १३,०६,३८०/-
२) सोन्याचे दागिने : ५८९ ग्रॅम किंमत अंदाजे, ५०,९९,५८३/-
३) चांदीचे दागिने – ३ किलो ५५३ ग्रॅम किंमत ३,३९,३४५/-
मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण किंमत- ६७,४५,३०८/- रुपये मिळून आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR