24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यास २ तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी

मुंबईत बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यास २ तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याच्या वेळेवरील निर्बंध हायकोर्टाने वाढवले आहेत. आता केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची मुभा असेल. यापूर्वी सायंकाळी ७ ते रात्री १० अशी परवानगी होती. आता त्यावर मर्यादा आणल्या आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाच्या प्रश्नावर हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान हवेची गुणवत्ता न सुधारल्यास दिवाळीत मुंबईतील बांधकामांवर निर्बंध लावण्याचे हायकोर्टाने संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष होते. मुंबई हायकोर्टाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर तूर्तास बंदी नाही. मात्र, काही निर्बंध लागू राहतील, असे स्पष्ट केले. १९ नोव्हेंबरपर्यंत बांधकामातील डेब्रिज वाहून नेणा-या ट्रकवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आली. सामानाची ने-आण करण्यास मुभा असणार आहे. मात्र डेब्रिज वाहतुकीवर बंदी लागू असणार असल्याचे हायकोर्टाने म्हटले.

हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत समिती
हवा गुणवत्ता निर्देशांकासंदर्भात काम करण्याकरिता एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. या समितीत ज्यात नीरी आणि आयआयटी मुंबईतील विषयाशी संबंधित तज्ज्ञ आणि एक निवृत्त प्रधान सचिव नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती दर आठवड्याला अहवाल तयार करून कोर्टात सादर करेल.

वेबसाईटवर माहिती द्या
महापालिकेने याबाबत स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. त्यासोबत पालिकेची वेब साईट, मोबईल अ‍ॅप यावरही सारी माहिती अपडेट होणे गरजेचे असल्याचे हायकोर्टाने सांगितले. याबाबतीत एमएमआर क्षेत्रातील अन्य पालिकांनीही आपला डेटा अपडेट करायला हवा असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR