कुर्डूवाडी : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे १० लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. पासून ते दि. १८ रोजी सायं ८ वा दरम्यान कुर्डूवाडी शहराजवळील छोरिया टाऊनशीप, कुर्डू हद्दीत (ता.माढा) येथे घडली. याबाबत विठ्ठल निवृत्ती ननवरे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी विठ्ठल ननवरे हे दि. १७ एप्रिल रोजी घराला कुलूप लावून आपल्या पत्नीसह पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरपूर येथील गजानन महाराज मठामध्ये त्यांनी मुक्काम केला व दुस-या दिवशी सायंकाळी ६.४५ च्या रेल्वेने कुर्डूवाडी येथे परत घरी आले त्यावेळी त्यांच्या घराची कुलूप तुटलेले होते.
त्यानंतर त्यांची पत्नी फिर्यादी व त्यांची पत्नी घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते बेडरूम मधील कपाट उघडे होते. कपाटा मधील सोने-चांदीचे दागिने पाहिले असता ते दिसून आले नाहीत. त्यावेळी त्यांनी शेजारील लोकांकडे चौकशी केली की इकडे कोणी आले होते का तर त्यांनी त्यांना माहीत नाही असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांना खात्री झाली की आपल्या घरात चोरी झालेली आहे व कपाटाचे लॉक तोडून कपाटा मधील सोने-चांदीचे दागिने पुढीलप्रमाणे ८० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे मिनी गंठण,१ लाख ६० हजार रूपये किमतीचे चोकर दोन तोळे वजनाचे,४ लाख रूपये किमतीच्या पाच अंगठ्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या,२ लाख रूपयांच्या पाच अंगठ्या प्रत्येकी अर्धा तोळे वजनाच्या,२४ हजार रूपये किमतीची तीन ग्रॅम वजनाचे लेडीज अंगठी,४० हजार रूपये किमतीचे कानातील वेल,सहा ग्रॅम वजनाचे ८ हजार रूपये किमतीची नथ, एक ग्राम वजनाची,४० हजार रूपये कानातील दोन रिंगा,पाच ग्रॅम वजनाच्या ४ हजार रूपये चांदीचे करंडे,चांदीचे गणपती मूर्ती,चांदीचे धातूची जोडवी पैंजण,८ हजार रूपये एक ग्रॅम वजनाचे काळ्यामणीचे गंठण असा एकूण ९ लाख ६४ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.याबाबत विठ्ठल ननवरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अतुल मोहिते हे करीत आहेत.
दि.१० एप्रिल रोजी भोसरे हद्दीत दुचाकीस्वारांनी मंदिरातून घरी परतणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले होते. या घटनेस सात दिवसांचा कालावधी उलटला असून त्यात या धाडसी घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,कुर्डूवाडी पोलिसांपुढे चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले असल्याचे नागरिकांमधून चर्चीले जात आहे.
















