29.9 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीडची ऋचा कुलकर्णी न्यायाधीश परीक्षेत राज्यात प्रथम

बीडची ऋचा कुलकर्णी न्यायाधीश परीक्षेत राज्यात प्रथम

न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर

बीड : बीडमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणा-या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी ऋचा हिने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश मिळवले. एवढेच नाही तर ती राज्यात पहिली आली आहे. सन २०२३ मध्ये ही परीक्षा झाली होती त्यानंतर २०२४ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

ऋचा हिचे वडील पिग्मी एजंट तर आई अंगणवाडी शिक्षिका आहे. दोघांनी अतिशय कष्टातून मुलीला शिक्षण दिले. तिने या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल कुलकर्णी कुटुंबाचे अभिनंदन केले जात आहे. अतिशय कठीण परिस्थितीत मुलीचे शिक्षण पूर्ण केले आणि मुलीने अशा पद्धतीने यश मिळाल्याने विठ्ठल कुलकर्णी यांना अश्रू अनावर झालेत.

या परीक्षेत मिळवलेल्या यशानंतर ऋचा कुलकर्णी हिने खूप आनंद होतोय, असे म्हटले. वडील पिग्मी एजंट असून आई अंगणवाडी शिक्षिका होती, तिने २०१९ मध्ये ती सोडली होती. आई वडिलांची खूप मेहनत आहे यामध्ये, माझी मेहनत म्हणजेच अभ्यास १० टक्के असून आई वडिलांचे श्रम आणि गुरुजनांचं आशीर्वाद ९० टक्के आहे असे ऋचा कुलकर्णी म्हणाले.

वडील पिग्मी एजंट आहेत, त्यांना १०० रुपयांना २ रुपये कमिशन मिळते, त्यातून १५ हजार रुपयांचा खर्च भागवणे अवघड होते. वडील दोन ड्रेसवर राहिले पण आमच्या गरजा पुरवत राहिले, आईची पण तशीच मेहनत आहे असे ऋचा कुलकर्णी यांनी सांगितले.

ऋचाचे वडील काय म्हणाले?
बीड शहराने खूप सहकार्य केले, बीडच्या लोकांनी खूप सहकार्य केले. बीडच्या लोकांचे उपकार आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे. गेल्या ३५ वर्षांपासून पिग्मी एजंट म्हणून काम केले. एक रुपयाची फसवणूक केली नाही. बीड शहरातील सगळ्या लोकांनी सहकार्य केले, यामुळे इथपर्यंत पोहोचलो, हे सांगत असताना विठ्ठल कुलकर्णी भावूक झाले होते. लेकराने कष्टाचे चीज केले, याच्यामुळे आनंद वाटतो असेही विठ्ठल कुलकर्णी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR