मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहे.
अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. १ ते ३ मार्च दरम्यान होणा-या या सोहळ्यासाठी पॉप सिंगर रिहानालाही आमंत्रित करण्यात आले होते.
रिहानाने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, त्याबरोबरच तिच्या कृतीने नेटक-यांची मनं जिंकली आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये गाणं गायल्यानंतर रिहाना पुन्हा मायदेशी परतली. यावेळी एअरपोर्टवरील तिच्या कृतीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. रिहानाने एअरपोर्टवर पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. त्याबरोबरच तिने फॅन्सबरोबर फोटोही काढले. ह्लक छङ्म५ी कल्ल्िरंह्व म्हणत रिहानाने भारताबद्दल तिच्या भावनाही व्यक्त केल्या.