31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडारिंकू सिंहला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळावे

रिंकू सिंहला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळावे

नवी दिल्ली : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती आज अहमदाबादमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणा-या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पधेर्साठी १५ सदस्यीय भारतीय संघाला अंतिम रूप दिले जाणार आहे. यानंतर संघाची अधिकृत घोषणा एका दिवसानंतर म्हणजे १ मे रोजी केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अभिनेता शाहरूख खानने मोठे वक्तव्य केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान याने आपल्या संघाचा डावखुरा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगचा आगामी टी-२० विश्वचषक स्पधेर्साठी भारतीय संघात समावेश करण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी ही त्यांची वैयक्तिक इच्छा असल्याचे म्हटले आहे. २६ वर्षीय रिंकू प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याने आयपीएल २०२३ मध्ये केकेआरने गुजरात टायटन्स विरूध्द शानदार विजय मिळवला होता. रिंकूने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारले होते आणि केकेआरला विजय मिळवून दिला होता.

टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूंची कमतरता नसली तरी जेतेपदावर कब्जा करण्यासाठी निवडकर्त्यांना खेळाडूंची निवड करताना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. यामुळे रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. शिवम दुबे आणि रिंकू सिंग या दोघांनाही टी-२० विश्वचषकात घ्यायचे असल्यास निवडकर्त्यांना बॅकअप यष्टिरक्षक किंवा बॅकअप गोलंदाज मैदानात उतरवावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR