30 C
Latur
Saturday, June 21, 2025
Homeमनोरंजनऋषी कपूरची आठवण करून पत्नी नीतू कपूर झाल्या भावूक

ऋषी कपूरची आठवण करून पत्नी नीतू कपूर झाल्या भावूक

मुंबई : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाला ४ वर्षे झाली आहेत. ऋषी कपूर यांचे कोरोना महामारीच्या काळात कर्करोगाने निधन झाले. या दिवशी ३० एप्रिल २०२० रोजी त्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि चाहत्यांचा निरोप घेतला होता.

कपूर कुटुंबासाठी हा भावनिक दिवस आहे. या स्मरणार्थ ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. यासोबतच ऋषी कपूर यांचे चाहतेही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

नीतू कपूरला आजही पती ऋषी कपूरची आठवण येते. अशा स्थितीत नीतू कपूरने पुण्यतिथीच्या दिवशी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून एक भावनिक संदेश लिहिला आहे. नीतू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ४ वर्षे उलटून गेली… तुझ्याशिवाय आयुष्य कधीच पूवीर्सारखे होणार नाही. या पोस्टवर ऋषी कपूरचे चाहते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तर काही युजर्सनी नीतू कपूरला या कठीण काळात धैर्य राखण्यास सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR