33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीयकेरळच्या कन्नूरमध्ये भीषण अपघात; कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

केरळच्या कन्नूरमध्ये भीषण अपघात; कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : केरळमधील कन्नूरमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री कन्नापुरम भागात ही घटना घडली. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. मृतांमध्ये कालीचंदुक्कम येथील केएन पद्माकुमार , चुरिक्कत सुधाकरन, अजिता, कोझुम्मल कृष्णन आणि आकाश अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नापुरम परिसरात सोमवारी रात्री १०.१५ वाजता ही घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जण थलासेरीहून कासारगोडच्या दिशेने कारमधून जात होते. तर दुस-या बाजूने मंगळुरूहून गॅस सिलिंडर घेऊन जाणारी लॉरी येत होती या दोनी वाहनाचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेंव्हा चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एका नऊ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातात ट्रक चालकही जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR