25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकॅलिफोर्नियातील ‘पीएनजी’ ज्वेलर्सवर दरोडा

कॅलिफोर्नियातील ‘पीएनजी’ ज्वेलर्सवर दरोडा

सनीवेल : वृत्तसंस्था
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सवर २० हून अधिक दरोडेखोरांनी सिनेस्टाइल दरोडा घालत दागिने लुटून नेले. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मराठमोळ्या सराफांच्या अमेरिकेतील पेढीवर पडलेल्या या दरोड्याने खळबळ माजली आहे.

पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा टाकल्यावर दरोडेखोरांनी काचेची कपाटे हातोड्याने फोडून त्यातील दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांनी तपास करत दरोडेखोरांच्या कारचा मागोवा काढला. त्यांचा पाठलाग सुरू असताना, दरोडेखोरांनी दागिने रस्त्यावर फेकले. किॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथील पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूमवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला होता. अमेरिकेतील भारतीय दागिन्यांच्या दुकानांवर गेल्या दीड महिन्यात तीन दरोडे पडले आहेत. सनीवेल येथील नितीन ज्वेलर्सवर ४ मे रोजी, तर नेवार्क येथील भिंडी ज्वेलर्सवर २९ मे रोजी दरोडा घालण्यात आला. त्यानंतर आता पीएनजी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली. अशा दुकानांत शिरून तेथील काचेची कपाटे हातोड्याने फोडायची व त्यातील दागिने चोरायचे, अशी समान पद्धत या तीनही गुन्ह्यांत दिसून आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR