मुंबई : आयपीएल २०२४ मधील चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात असून या सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माकडून भरपूर चौकार आणि षटकारांची अपेक्षा होती. पण रोहितने चाहत्यांना नाराज केले.
यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा आऊट झाला. रोहितला राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण रोहितला या सामन्यात अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. आयपीएलमध्ये जसे ट्रेंट बोल्ट पहिल्याच षटकात संघासाठी विकेट घेतो, तसेच या सामन्यातही दिसून आले आहे.
दुसरीकडे, आता आयपीएलमध्ये सर्वांधिक गोल्डन डक बाद होण्याचा लज्जास्पद विक्रम रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत १७ वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. रोहितपूर्वी आरसीबीचा दिनेश कार्तिकही आयपीएलमध्ये १७ वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे.
गोल्डन डकवर आऊट झालेले खेळाडू
रोहित शर्मा – १७ वेळा
दिनेश कार्तिक – १७ वेळा
पियुष चावला – १५ वेळा
मनदीप सिंग – १५ वेळा
ग्लेन मॅक्सवेल – १५ वेळा
सुनील नारायण – १५ वेळा