कीव : युक्रेनने लष्करी विमान पाडल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. रशियाचे लष्करी विमान युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोड भागात कोसळले. स्थानिक गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी सांगितले की, विमान कोरोचान्स्की जिल्ह्यात क्रॅश झाले. अपघातस्थळाची नाकेबंदी करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या विमानात एकूण ७४ लोक होते आणि या सर्वांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्थेने वृत दिले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचे ‘क्रूर’ असे वर्णन केले आहे. विमानात ६५ युक्रेनियन युद्धकैदी होते, ज्यांना बदलीसाठी नेले जात होते. या विमानात सहा क्रू मेंबर्स आणि तीन सहाय्यकही होते.