सेलू : संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून विषमता, अंधश्रद्धेवर प्रहार केला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे तत्वज्ञान दिले असे प्रतिपादन डॉ. गंगाधर गळगे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे २२ वे पुष्प दि.२८ रोजी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात संपन्न झाले. या उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गळगे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नाटककार भिष्म साहनी यांच्या कबिरा खडा बजार में या नाटयकृतीचे अंतरंग उलगडले.
अध्यक्षस्थानी पुष्पा काला होत्या. प्रमुख पाहुणे क्षमा बिनायके यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. गळगे म्हणाले की, पद्मभूषण भिष्म साहनी यांनी लिहिलेले कबिरा खडा बाजार में हे तीन अंकी नाटक आहे. ते आजही संगीत नाटक, पथनाट्याच्या स्वरूपात कुठे ना कुठे सादर होते. समाजात प्रेम, समता, बंधुता कबीराने रूजविली. अन्यायाचा प्रतिकार करायला शिकविले असेही ते म्हणाले. यावेळी क्षमा बिनायके यांनी संत कबीर यांच्या विविध दोह्यांचा दाखला दिला.
कार्यक्रमात विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉ. सुरेश हिवाळे, कांचन हिवाळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. रवी कदम, सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, सविता पल्लेवाड, रुपाली काला, लिना काला, शोभा बिनायके, किर्ती बिनायके, आरती बिनायके, कोमल काला, सपना काला, डॉ. शरद ठाकर, बाळू बुधवंत, सुभाष मोहकरे, रघुनाथ देशमुख, शिवाजी बोचरे, आनंद बाहेती यांची उपस्थिती होती.