मुंबई : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे, ज्यात ‘दबंग ४’ चाही समावेश आहे. आतापर्यंत दबंगचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत त्यात चुलबुल पांडेची अदाकारी पाहून आनंदी झालेले प्रेक्षक सलमान खानला ‘दबंग ४ ’ मध्येही चुलबूल पांडेच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच अरबाज खाननेही या चित्रपटाविषयी एक मोठी माहिती शेअर केली आहे.
दबंग ४ ची सलमान खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच नुकतीच अशी अफवा पसरली होती की, सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान ‘दबंग ४’ वर चर्चा करण्यासाठी ‘जवान’ दिग्दर्शक अॅटलीची भेट घेतली होती. दबंग २ चे दिग्दर्शन करणा-या अरबाजने नुकतीच याबाबत माहिती दिली. अरबाज खानने सांगितले की, तो त्याच्या आयुष्यात कधीही दिग्दर्शक एटलीला भेटला नाही.
अरबाजने ‘दबंग ४’ ची पुष्टी करत सांगितले की सलमान खानला देखील दबंग ४ करण्यात रस आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर तो प्रोजेक्टवर काम करणार असून, मला ‘दबंग ४’ चे दिग्दर्शन करायला आवडेल असेही अरबाज म्हणाला. अरबाज आणि सलमान सध्या त्यांच्या वैयक्तिक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.
सलमानचे आगामी चित्रपट
सलमानकडे ‘दबंग ४’ व्यतिरिक्त शाहरुख खानसोबत ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हाही चित्रपट आहे. अलीकडेच, त्याने ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित साजिद नाडियादवालासोबत एका नवीन चित्रपटाची घोषणा केली असून, हा बिग बजेट चित्रपट २०२५ च्या ईद दरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहे. सलमान खान शेवटचा ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण २८६ कोटींची कमाई केली होती .