24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसमाजवादी लोकसभेच्या ६५ जागा लढवणार!

समाजवादी लोकसभेच्या ६५ जागा लढवणार!

लखनौ : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीच्या सुरवातीला काही बैठक पार पडल्या पण पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेस व्यस्त असल्याचे दिसत आहे. काँग्रेस या आघाडीचा मोठा आणि प्रमुख पक्ष आहे. अजून इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा फार्मुला ठरलेला नाही. पण अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष (सपा) लोकसभेच्या ६५ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इंडियाच्या सहयोगींसाठी समाजवादी पक्ष १५ जागा सोडणार असल्याचे बोलले जात आहे. आता यावर काँग्रेस काय भूमिका घेते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ६५ जागांवर समाजवादी पक्ष आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. ६५ जागांसाठी उमेदवारांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. सपा आपल्या मित्रपक्षांना १५ जागा सोडणार आहे. सपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. अमेठी, रायबरेली, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, कानपूर, आग्रा, बागपत, मथुरा, बुलंदशहर, वाराणसी, प्रयागराज, बांसगाव, देवरिया, झासी, महाराजगंज या जागा आघाडीच्या इतर पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

सपाचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या राज्य मुख्यालयात प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. ‘सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांना राज्यातील सर्व ८० लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करण्यास सांगितले. यातील ६५ जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या पाहिजेत, असे बोलून अखिलेश यांनी उत्तर प्रदेशातील ६५ जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत का, या प्रश्नावर चौधरी म्हणाले, ‘हो, त्यांनी तेच संकेत दिले आहेत.

संविधान वाचवण्यासाठी ‘ही’ शेवटची निवडणूक
सपाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अखिलेश यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुका आगामी पिढ्यांचे भवितव्यही ठरवतील. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची निवडणूक असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR