संभाजीनगर : उद्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कुठे १०९ कुंडात्मक महायाग आयोजित करण्यात आले आहेत, तर वेगवेगळ्या १९६ मंदिरांत प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहेत.
संभाजीनगर शहरातील सुमारे १९६ मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. सोबतच शहरातील वेगवेगळ्या भागात प्रभू श्रीराम रथयात्रा काढण्यात येत आहे. सोबतच श्रीराम मंदिर निर्माणाचा इतिहास लेझर शोच्या माध्यमातून नागरिकांना दाखवण्यात येत आहे.