पैठण रोडवर वाळूचा हायवा कारवर उलटला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण रोडवर सोमवारी सायंकाळी एका भरधाव हायवा ट्रकने कारला चिरडल्याची भीषण घटना घडली. वाळूची अवैध वाहतूक करणारा हा हायवा ट्रक इतक्या वेगात होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट रस्त्यावरून जाणा-या कारवर उलटला. या भीषण अपघातात कारचा पूर्णत: चक्काचूर झाला असला, तरी सुदैवाने कारमधील दोन्ही प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हायवा कारवर उलटत असताना एका प्रवाशाने प्रसंगावधान राखून चालत्या कारमधून बाहेर उडी मारली. मात्र, दुसरा प्रवासी कारमध्येच अडकला होता. अपघात घडताच परिसरातील जागरूक नागरिकांनी तातडीने धाव घेत मोठ्या शर्थीने अडकलेल्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले. या थरारक अपघातामुळे पैठण रोडवर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

वाळूमाफियांच्या विरोधात संताप
हा अपघात अनियंत्रित आणि अवैध वाळू वाहतुकीमुळे झाल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे. पैठण रोडवर वाळू वाहतूक करणा-या वाहनांचा वेग प्रचंड असतो आणि त्यांच्यावर प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news