22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरशासकीय रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी संपावर

शासकीय रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी संपावर

सोलापूर : कंपनीकडून अचानक कर्मचा-यांची संख्या कमी करण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील कंपनीच्या स्वच्छता कर्मचा-यांनी काम बंद केले. यामुळे हॉस्पिटल परिसरात अस्वच्छता पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी पगार वेळेवर होत नाही, पगार स्लिप मिळत नाही व अन्य कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील खासगी कंपनीचे स्वच्छता कर्मचारी संपावर गेले होते. हा संप काही दिवसांपूर्वीच मिटला; पण त्यानंतर पुन्हा एकदा तेथील कंपनीचे कर्मचारी आंदोलन करीत काम बंद केले आहे. यामुळे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये स्वच्छता व विविध सुविधा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने रुग्णांचा हॉस्पिटलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय पूर्वी शासकीय हॉस्पिटलमध्ये जी अस्वच्छता अथवा परिसरात घाण पाहायला मिळत होती.ती आता काही अंशात कमी झाली आहे; पण पुन्हा ‘बे’चे पाढे पंचावन्न झाल्याचा प्रकार पाहायला मिळत असल्याची चर्चा रुग्णांकडून होत आहे. दरम्यान, काम बंद आंदोलन कधी थांबेल, याबद्दल माहिती मिळाली नाही; पण काही कर्मचारी याबाबत अधिष्ठातांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, याबाबत प्रशासनाची संपर्क होऊ शकला नाही.काही दिवसांपूर्वी कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे स्वच्छतेचे काम थांबले होते. दरम्यान, कंपनीकडून आम्ही स्वच्छतेचे काम बंद करू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कंपनीने शासकीय रुग्णालयात ठेवलेले विविध स्वच्छतेचे साहित्य नेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.सध्या शासकीय रुग्णालयातील ओपीडी ब्लॉकमध्ये अस्वच्छता असल्याचे पाहायला मिळत आहे.

जे कर्मचारी तेथील स्वच्छता करतात तेथील कचरा हा वेळेवर उचलला जात नाही. जेव्हा येथील स्वच्छता केली जाते, तेव्हा तेथील घाणीचा विल्हेवाट न लावता तेथील विविध कोप-यात टाकले जाते. यामुळे सध्या हा कचरा पहिल्या मजल्यावरून दुस-या मजल्यावर जात असताना असणा-या जिन्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे तेथे घाण झाल्याचे पाहायला मिळते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR