20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रवंचिततर्फे रावेरमध्ये संजय ब्राह्मणे मैदानात

वंचिततर्फे रावेरमध्ये संजय ब्राह्मणे मैदानात

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने भुसावळ येथील अभियंता संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

महाविकास आघाडीशी बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर करणे सुरु केले आहे. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुस-या यादीत रावेरमधून संजय ब्राह्मणे यांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

ब्राह्मणे हे स्थापत्यशास्त्र अभियंता आहेत. ते नंदुरबार येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. मूळचे धुळे येथील रहिवासी असलेले ब्राह्मणे हे सध्या भुसावळमध्ये वास्तव्याला आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR