22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीपरभणीत महायुतीची सरशी

परभणीत महायुतीची सरशी

परभणी : जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवत बाजी मारली तर महाविकास आघाडीला केवळ एका विधानसभा मतदारसंघात विजय मिळवता आलेला आहे. चारही विधानसभा मतदार संघात निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.

परभणी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे व महाविकास आघाडीचे आ. डॉ. राहुल पाटील यांच्यात सुरुवातीला अतिशय अटीतटीची लढत झाली. यात आ.डॉ. राहूल पाटील यांनी या ठिकाणी ३३५४० हजारांचे मताधिक्य घेत विजयाची हॅट्रीक साधली. ंिजतूर, सेलू विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आ. मेघना साकोरे बोर्डीकर व महाविकास आघाडीचे माजी आ. विजय भांबळे यांच्यात लढत झाली. यात बोर्डीकर यांनी ४५७६ मतांनी माजी आ. भांबळे यांचा पराभव केला.

पाथरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सुरेश वरपूडकर यांचा १३२०४ मतांनी परभव करत आ. विटेकर यांनी विजयश्री खेचून आणली. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत रासपचे उमेदवार आ. रत्नाकर गुट्टे व महाविकास आघाडीचे विशाल कदम यांच्यात लढत झाली. यात २५७१७ मतांनी विशाल कदम यांचा पराभव करीत आ. डॉ. गुट्टे यांनी सलग दुस-यांदा विजय मिळवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR