पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांमध्ये बुधवारी हाणामारी झाली. त्यानंतर गुरुवारी विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार अभाविपने केली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान त्यांचा नवसमाजवादी पर्याय संस्थेच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. यावेळी विद्यापीठाबाहेर जोरदार राडाही झाला. पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठात सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सर्व प्रवेशद्वारांवर आवश्यक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.
मागील काही घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, विद्यापीठात प्रवेश करणाऱ्यांची चौकशी आणि नोंदणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. अशा घटनांमुळे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात येत आहे.