35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरजप्त केलेली किटकनाशके, खांचा बोलीद्वारे जाहीर लिलाव

जप्त केलेली किटकनाशके, खांचा बोलीद्वारे जाहीर लिलाव

लातूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशान्वये उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर महाराष्ट्र शासनाच्यावतीने तन्वी अ‍ॅग्रो एजन्सी, बोरी ता. लातुर यांच्या जप्त केलेल्या किटकनाशके , खते, तणनाशके, व इतर कृषि साहित्याचे जाहीर लिलाव बोलीद्वारे शासनाच्या (ऑनलाईन) ई-ऑक्शन या बेबसाईट वर दि. २२ नोव्हेंबरपासून सुरु करीत आहे. या मालाची अंदाजे एकूण किंमत २७ लाख २९ हजार ६७६ आहे. या ई-ऑक्शन मध्ये खते, किटकनाशके परवानाधारक दुकानदार, फर्म, एफ. पी.ओ., एफ.पी.सी, शेतकरी गट तसेच स्वत: शेतकरी भाग घेऊ शकतात.

या कार्यवाही संबंधित बुकलेट शासनाच्या संकेतस्थळावर ँ३३स्र२://ीं४ू३्रङ्मल्ल.ॅङ्म५.्रल्ल उपलब्ध आहे. तसेच ई-ऑक्शनमधील बोली स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी लातूर यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली बोली स्विकारली जाणार नाही. खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे. ँ३३स्र२://ीं४ू३्रङ्मल्ल.ॅङ्म५.्रल्ल सदर ई-ऑक्शन सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील बेवसाइटवरती कळविण्यात येईल, असे उप विभागीय कृषी अधिकारी लातूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR