ताडकळस : येथील रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात सोमवार, दि.५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या विशेष बैठकीत उपसरपंच म्हणून धुरपताबाई रेश्माजी जल्हारे यांची निवड करण्यात आली.
ताडकळस येथील उपसरपंच पद रिक्त झाले होते. या पदाच्या निवडीसाठी तहसील कार्यालयाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी धुरपताबाई जल्हारे व बालासाहेब डिंगाबरराव आंबोरे या दोघांनी अर्ज दाखल केल्यामुळे प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. एकुण १४ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. या मतदान प्रक्रियेत धुरपताबाई जल्हारे यांना १० तर बालासाहेब आंबोरे यांना ३ सदस्यांची मते पडल्याने उपसरपंच म्हणुन धुरपताबाई जल्हारे यांची निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे यांनी घोषित केले.
यावेळी धुरपताबाई जल्हारे यांना सरपंच गजानन अंबोरे, भगवान लाकडे, शितल दिपक अंबोरे, छाया सुरेश मगरे, ज्ञानोबा घोडके, योगेश्वरी गजानन आळणे, संपदा गजानन अंबोरे, धुरपताबाई जल्हारे, खंडेराव वावरे, महादु (बबलू) माने यांनी तर बालासाहेब आंबोरे यांना केसरबाई वामनराव मोहिते, प्रभावतीबाई दिलीप आंबोरे, बालासाहेब आंबोरे हे तीन मते पडली. निवड झाल्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.