35.9 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeपरभणीराज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी १० नोव्हेंबर रोजी निवड चाचणी

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी १० नोव्हेंबर रोजी निवड चाचणी

परभणी : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीमध्ये नाशिक या ठिकाणी १९ वर्षातील मुले व मुलींच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

सदरील स्पर्धेसाठी परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट संघ निवड व परभणी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा दि. १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा जी.एम. वस्तानवी उर्दू महाविद्यालय, पोखर्णी रोड, पाथरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.

सदरील निवड चाचणी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंचे वय १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचे असणे आवश्यक आहे. निवड चाचणीसाठी येताना प्रत्येक खेळाडूंनी आपला जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड, आधार कार्डची झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे आवश्यक आहे. पात्र खेळाडूंनी ९ नोव्हेंबर पर्यंत आपल्या नावाची नोंदणी अधिकृत गुगल फॉर्म करणे आवश्यक आहे. त्यासाठी इच्छुक खेळाडूंनी नोंदणी करण्याचे आवाहन परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव शेख मुजीब यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR