लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात मुलींसाठी परमपूज्य श्री. माताजींच्या परमकृपेने दि. २५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आत्मसाक्षात्कार व कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाप्रसंगी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, प्रा. मेघा पंडित, डॉ. मनीषा अष्टेकर, डॉ. सुनीता बजाज, बन्सी कांबळे, श्रीमती राठोड, कल्पेश मोर्या, सौ. निटुरे, जोशीताई, बोराडेताई, वसतिगृह अधीक्षक वैशाली चिकले, पर्यवेक्षक रेवती जोशी, प्रभा वराडे, वनिता यमपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कल्पेश मोर्या यांनी सहजयोग ध्यान पद्धतीबद्दलची माहिती सांगताना ही ध्यान पद्धती वर्तमान काळात जगण्यासाठी उपयुक्त्त आहे. या ध्यान पद्धतीचा अवलंब करुन आपण आत्मसाक्षात्काराची अनुभूती घेऊ शकतो. तसेच या ध्यान पद्धतीला वैज्ञानिक आधार असल्याचे स्पष्ट केले, तर श्रीमती राठोड यांनी प्रात्यक्षिकांसहित सहजयोगाचे महत्त्व सांगताना परमेश्वरी शक्तीशी एकरूपता व प्रार्थनेचे महत्त्व,रोगावर नियंत्रण याविषयी माहिती सांगितली.याप्रसंगी प्रा.मेघा पंडित यांनीही आत्मसाक्षात्कार आणि मन:शांतीसाठी सहजयोग करणे अत्यंत गरजेचे आहे, असे विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार वैशाली चिकले यांनी मानले. याप्रसंगी सौ. कांबळे विद्या, सौ. धावारे संगीता, सौ. सोनकांबळे उषा, श्रीमती श्ािंदे रुपाली, सौ. सूर्यवंशी शोभा यांच्यासह सहजयोगी ताई, दादा उपस्थित होते.