24.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवारी

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवारी

मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक उद्याच होणार आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. कालच मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. याबद्दल राज्य शासनाकडून आदेश मिळल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी होणा-या या निवडणुकीच्या स्थगितीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर आता कोर्टाच्या निर्णयानंतर ही निवडणूक उद्याच म्हणजे २२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता १० नोंदणीकृत जागांसाठी येत्या २२ सप्टेंबर २०२४ साठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवासेनेविरुद्ध अभविप यांच्यासह मनसेने देखील कंबर कसली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातले आहे. मात्र काही तासांवर आलेली निवडणूक अचानक राज्य सरकारच्या निर्देशांनंतर रद्द करम्यात आली होती. राज्य सरकारचे आदेश आल्याने निवडणूक स्थगित करत असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून टीका केली जात होती.

मुंबई विद्यापीठाची १० जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी सर्वतयारी करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई हायकोर्टाने सिनेट निवडणूक स्थगित करण्याची १९ तारखेचे विद्यापिठाचे आदेश रद्द करत उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शासन निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला होता तो तुम्ही चालू ठेवा. पण निवडणुका उद्याच घ्या असे आदेशात म्हटले आहे. तडका फडकी स्थगिती पत्र शासन कसे काढू शकतात? याबाबत ऑनलाईनही केवळ एकच पत्र कसं काय? असे प्रश्न उपस्थित कर हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे. युवा सेनेचे नेते मिंिलद साटम यांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR