26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल अहमद सारदगी यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल अहमद सारदगी यांचे निधन

कलबुर्गी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इक्बाल अहमद सारदगी यांचे आज (दि. २२) पहाटे कलबुर्गी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कलबुर्गी लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते.

गुलबर्गा येथे ५ जून १९४४ रोजी इक्बाल अहमद सारदगी यांचा जन्म झाला. सारदगी यांनी गुलबर्गा येथील कला आणि विज्ञान महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. १९९९ मध्ये सारदगी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे बसवराज पाटील सेदाम यांचा ६९ हजार मतांच्या फरकाने पराभव करून पहिल्यांदा ते लोकसभेत गेले होते. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा पाटील सेदाम यांचा पराभव करून सलग दुस-यांदा लोकसभेत कलबुर्गीचे प्रतिनिधित्व केले.

२००८ मध्ये मतदारसंघांच्या परिसीमनानंतर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, तेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांना सारदगी यांची जागा मिळाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार उमेश जाधव यांच्याकडून पराभूत होण्यापूर्वी खरगे यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सारदगी नंतर २०१४ मध्ये कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इक्बाल अहमद सारदगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR