27.2 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeपरभणीदिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा : आ. डॉ. राहुल पाटील

दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा : आ. डॉ. राहुल पाटील

परभणी : दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून याच भावनेतून आपण मतदार संघातील दिव्यांगासाठी विविध उपक्रम राबवत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक पद्धतीची मॉड्यूलर हात, पाय आणि कॅलिपर साहित्य दिव्यांगाला दिले जाणार आहेत अशी माहिती आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

परभणी मेडिकल कॉलेज यांच्या सहयोगाने भारत विकास परिषद विकलांग केंद्र आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक मॉड्यूलर पाय, हात व कॅलिपर मोजमाप शिबिर परभणी मेडिकल कॉलेज येथे पार पडले. यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी भारत विकास परिषद विकलांग केंद्र समन्वयक विनय खटावकर, शिवसेनासह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, संजय गाडगे, सदाशिव देशमुख, अरविंद देशमुख, डॉ. आमेर, आबासाहेब देशपांडे, सुचिता खटावकर, विशू डहाळे, बाळराजे तळेकर, प्रभू जैस्वाल, तानाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, आतापर्यंत दिव्यांगाना जयपुर फुटच्या माध्यमातून साहित्य दिले जात होते. परंतु ते कालांतराने खराब होत होते म्हणून अत्याधुनिक पद्धतीचे साहित्य देण्याचा शोध सुरू होता. त्यातूनच भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मॉड्युलर पाय आणि हात व अन्य साहित्य दिव्यांगाना देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोजमाप घेऊन हे साहित्य तयार केले जाणार असून दैनंदिन जीवनामध्ये दिव्यांगाना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे असे आ. पाटील म्हणाले. परभणी मतदारसंघात मोतीबिंदूू मुक्त परभणी मतदार संघ यासह दररोज आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येत आहेत. याआधी दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून आपण गिनीज बुकात विक्रम नोंद केला आहे असे देखील आ. डॉ. पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील दिव्यांगाना अत्याधुनिक पद्धतीचे कृत्रिम साहित्य मिळावे यासाठी आ. डॉ. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत नोंदणीकृत दिव्यांगांना हे साहित्य दिले जाणार आहे. त्यासाठी रविवारी मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मोजमाप केलेल्या दिव्यांगांना लवकरच साहित्य वाटप केले जाणार आहे अशी माहिती यावेळी विनय खटावकर यांनी दिली. या मोजमाप शिबिरात ३४७ एवढ्या दिव्यांगानी नोंदणी केली होती. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नवनित पाचपोर, प्रकाश जाधव, पुंजाराम बुनगे, गोपिनाथ घनगाव, रितेश लासे, विलास राठोड, माधव घायाळ, ज्ञानेश्वर राठोड, अर्जुन राठोड, गजानन माळवदकर, विष्णु वैरागर, संजय लोखंडे आंिदनी परीश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR