31.6 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी सेवा वरदान ठरतील

मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी सेवा वरदान ठरतील

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांचे मत

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ म्हणाले, राज्य कर्करोग संस्थेच्या इतिहासात आजचा हा दिवस महत्वाचा आहे. कर्करोग रुग्णांसाठी २०१२ मध्ये १०० बेडवर सुरू झालेला कर्करोग रुग्णालयाचा ३०० बेडपर्यंत विस्तार झाला आहे. राज्यात जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. कर्करोग रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन सुविधा देण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी या सुविधा निश्चितपणे वरदान ठरतील. या संस्थेला एम्सचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी केली. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. शासकीय रुग्णालयात बा रुग्ण विभागात दररोज तीन ते चार हजार रुग्ण येतात. त्यांना दर्जेदार सेवा देणे शासनाचे कर्तव्य आहे. येत्या दोन वर्षात जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. जेणेकरुन खासगी रुग्णालयात रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही. अशी व्यवस्था उभारण्यासाठी राज्य शासनाकडून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ. कैलास शर्मा यांनी कर्करोग व उपचार व्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी भारतीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय प्रयोगशाळेबाबतचे विधेयक संमत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR