23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रहायवोल्टेज तार पडून बसमध्येच मृत्यूचं तांडव, १० जागीच ठार

हायवोल्टेज तार पडून बसमध्येच मृत्यूचं तांडव, १० जागीच ठार

लखनऊ : नुकतीच मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंडक्टर, ड्रायव्हर आणि ३८ प्रवाशांसह प्रवास करत असलेल्या एका बसवर हायवोल्टेज तार पडली, ही तार ११ हजार वोल्टची होती, ज्यामुळे काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागून १० प्रवासी जागीच होरपळून मृत पावली असून अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये लग्नाचे व-हाडी होते. मात्र, ही बस कुठून येत होती आणि कुठे जात होती हे कळू शकलेलं नाही. नुकतेच एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका मुलाला वाचवले जाऊ शकते. बसमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि ३८ लोक प्रवास करत होते. ज्यांपैकी १० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. तर बाकी लोक जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे घडली सोमवारी सकाळी घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हाय टेंशन वायर पडल्याने बसला आग लागली. बसमध्ये प्रवास करणा-याअनेकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना मर्दाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाहर धामजवळ घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून अधिका-यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या लोकांनी घटनास्थळी दगडफेक सुरू केली असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्हा दंडाधिकारी आर्यका अखौरी आणि पोलीस अधीक्षक ओमवीर सिंगही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, बस जिल्ह्याबाहेरची आहे. ही घटना कशी घडली याचा तपास सूरू आहे. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला? हे आत्ताच सांगणे कठीण आहे, असे पोलिस अधीक्षक म्हणाले.

दरम्यान , मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर दुर्घटनेची दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जळालेल्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR