33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयदिल्ली पोलिस पथकावर हल्ला, चौघांना घेतले ताब्यात

दिल्ली पोलिस पथकावर हल्ला, चौघांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीत एका गुन्हेगाराला पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी रात्री गुन्हेगार आदिलच्या शोधात मोहन गार्डन पोलिस ठाण्याचे एक पथक आले असता राजौरी गार्डन आणि टिळक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला करण्यात आला, असे पोलिस उपायुक्त (पश्चिम) विचित्र वीर यांनी सांगितले.

यावेळी महिलांसह मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचे काही छायाचित्र पोलिसांच्या हाती लागली आहेत त्यामध्ये महिलांसह काहीलोक पोलिसांना खेचून धक्काबुक्की करताना दिसत आहेत.

या प्रकरणाची माहिती मिळताच गार्डन आणि टिळक नगर पोलिसांच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस आयुक्त विचित्र वीर म्हणाले की, या प्रकरणी आदिल आणि इतर तीन जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR