27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलोकसभेच्या १२ जागांवर शरद पवार गटाचा दावा?

लोकसभेच्या १२ जागांवर शरद पवार गटाचा दावा?

मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविणार आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, महाविकास आघाडीने तशा हालचालीही सुरू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शरद पवार गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी केली असल्याची बाब समोर आली आहे. शरद पवार गटाने लोकसभेसाठी १२ आणि विधानसभेच्या

५८ जागांसाठी उमेदवार निश्चित केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून महाविकास आघाडीत वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र लवकरच सुरू होईल. तत्पूर्वीच शरद पवार गटाने बैठक घेऊन सर्व मतदारसंघाचा आढावा घेतानाच संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा केल्याचे समजते. एवढेच नव्हे, तर विधानसभेत मूळ राष्ट्रवादीच्या ५८ जागा आहेत. या सर्वच जागांवर शरद पवार गट निवडणूक लढविणार असल्याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकसभेसोबतच विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत भविष्यात धुसफूस होण्याची शक्यता आहे.

निवडणुका जवळ आल्या असल्याने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप अपेक्षित होते. मात्र, महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबतचा तिढा कायम आहे. त्यामुळे त्यांच्या बैठकाही होत नाहीत. राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या बैठकाही होताना दिसत नाहीत. दरम्यान, महाविकास आघाडीतील जागा वाटप लवकरात लवकर व्हावे, यासाठी शरद पवार गट प्रयत्नशील असल्याचे बोलले आहे. मात्र, त्या अगोदरच शरद पवार गट लोकसभेच्या १२ जागांवर दावा सांगत असल्याने धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR