22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसलूनमध्ये सोन्याच्या वस्त-याने दाढी!

सलूनमध्ये सोन्याच्या वस्त-याने दाढी!

सांगली : प्रतिनिधी
सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने सर्वसामान्य नागरिक आणि शेतक-यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र, सांगलीत शेतक-यांची आणि सामान्यांची चक्क सोन्याच्या वस्त-याने दाढी केली जात आहे.

त्यांची सोन्याच्या वस्त-याने दाढी व्हावी आणि त्यांना आनंद मिळावा या हेतूने हे केले जात आहे. सांगलीच्या रिळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी हा अनोखा उपक्रम केला आहे. रिळेसारख्या ग्रामीण भागात हा आठ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली आहे.

शिराळा तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित केशकर्तनालय अनेक दशकांपासून सुरू आहे. त्यांची दोन मुलं अमोल आणि प्रदीप यांनी वातानुकूलित दुकान केले आणि चक्क जवळपास आठ तोळे वजनाचा वस्तरा तयार केला. त्याद्वारे ते फक्त शंभर रुपयांत दाढी आणि केस कापत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR