शिलाँग : आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत शिलाँग पोलिसांचा तपास फॉरेन्सिक अहवालावर अवलंबून आहे. आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे असले तरी, विशालच्या रक्ताने माखलेल्या शर्टचा, सोनमच्या रेनकोटचा आणि हत्येत वापरलेल्या शस्त्रावरील रक्ताचा तपास अहवाल आला आहे.
बुधवारी शिलाँग पोलिसांनी इंदूर येथून कंत्राटदार शिलोम जेम्स, चौकीदार बलवीर अहिरवार आणि इमारतीचे मालक लोकेंद्र तोमर यांना ताब्यात घेतले. तिथल्या न्यायालयाने तिघांनाही ६ दिवसांच्या रिमांडवर पाठवले. त्यांची अनेक मुद्द्यांवर चौकशी केली जाईल. त्यांना विशाल, सोनम आणि राज यांच्याशीही आमना-सामना केला जाईल. पोलिसांना मोबाईल डेटावरून आरोपींबद्दल माहिती मिळाली. पण, सोनम आणि राजा रघुवंशी व्यतिरिक्त, विशाल, आकाश आणि आनंद यांना शिलाँगमधील पर्यटक मार्गदर्शक, चहा दुकान मालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी पाहिले. अशा परिस्थितीत, तुरुंगात आरोपींची ओळख परेड घेतली जाईल.
पोलिसांनी या प्रकरणात दरोडा सारख्या कलमांचाही वापर केला आहे. ज्यामध्ये आरोपीची ओळख तुरुंगातच न्यायाधीशांसमोर केली जाईल. सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लॉगरचे व्हिडिओ हे देखील महत्त्वाचे पुरावे आहेत. शिलाँग पोलिस या प्रकरणात हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतील. सोनम, राजा रघुवंशी आणि तीन आरोपी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी हे एका ब्लॉगरच्या कॅमे-यात कैद झाले होते. हा व्हीडीओ हत्येच्या अगदी आधी बनवण्यात आला होता. ज्याच्या आधारे आरोपींना शिक्षा होऊ शकते.
उज्जैनमध्येच हत्येचे नियोजन
शुक्रवारी, राजाची आई उमा रघुवंशी यांनी आरोप केला की सोनमने अचानक उज्जैनला जाण्याचा विचार केला होता. तिथून तिने घराच्या दाराशी बांधण्यासाठी राजाला एक बाहुली दिली. उज्जैनमध्ये राजावर काही तांत्रिक विधी करण्यात आला होता. तो उज्जैनहून परतल्यापासून बदललेला दिसत होता.